आमच्याबद्दल माहिती

स्नेहांगण सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, शिंदेवाडी या संकेतस्थळावर (web portal) आपणा सर्वांचे सस्नेह स्वागत आहे.

आपल्या संस्थेचे बहुतांशी सभासद पुणे, मुंबई, सर्वदूर देशात व परदेशात नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने राहात असल्याने त्यांना छोट्या-मोठ्या कामांकरता शिंदेवाडीमध्ये येऊन सोसायटी संदर्भातील व्यवहार करणे अवघड पडते. म्हणून हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात येत आहे.

हे संकेतस्थळ इंटरॅक्टिव्ह आहे. थोडक्यात सांगायचे तर हे आपल्या सोसायटीचे virtual office आहे. हे संकेतस्थळ डेस्कटॉप /लॅपटॉप /टॅब /अँड्रॉईड/आयफोन मोबाईलवर देखील वापरता येण्यासारखे असून जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून आपण सोसायटीच्या संपर्कात राहून आपली ८० % कामे ह्या पोर्टलवरून करून घेऊ शकता.

हे virtual office केवळ स्नेहांगण सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, शिंदेवाडी येथील रहिवासी (सभासद /भाडेकरू) यांच्यापुरतेच सीमित आहे.

सभासदाने आपला सोसायटीकडे रजिस्टर्ड असलेला मोबाईल नंबर Log-in ID वर टाकल्यानंतर त्याच्या मोबाईलवर ओटीपी येईल, जो वापरून संकेतस्थळावर जाता येईल. आयफोन मोबाईल वापरणाऱ्या आणि भारताबाहेर राहणाऱ्या सभासदांनी Log-in ID वर सोसायटीकडे रजिस्टर्ड असलेला E-mail लिहून पासवर्ड टाकावा. (प्रत्येकाला मोबाईल नंबरबरोबरच E-mail ID वापरून Log-in करण्याची सुविधा देण्यात आलेली आहे) प्रत्येकाच्या ई-मेल वर त्याचा पासवर्ड पाठविण्यात आलेला आहे, नंतर तो चेंज करावा.

वेब पोर्टलवर गेल्यानंतर सभासदाने त्याचा स्वतःचा, त्याच्या कुटुंबीयांविषयीचा, भाडेकरू व त्याच्या कुटुंबीयांविषयीचा तसेच सोसायटीच्या आवारात ठेवण्यात येत असलेल्या त्याच्या आणि भाडेकरूच्या वाहनांविषयीचा सर्व आवश्यक तपशील भरून सेव्ह करावयाचा आहे. ही सर्व माहिती सोसायटी व्यवस्थापनाकडे update होत राहील. सर्व तपशील आवश्यक आहे कारण नजिकच्या काळात आपण सुरक्षिततेच्या दृष्टीने gate entry नियंत्रित करणार आहोत. नवीन सभासदांनी किंवा भाडेकरूंनी सर्वप्रथम सोसायटी कार्यालयाशी संपर्क साधून विहित फॉर्म प्रक्रिया पूर्ण करावी. हे झाल्यावर त्यांना वेब पोर्टलसाठी सोसायटीतर्फे लॉगिन ID देण्यात देईल. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सोसायटीच्या नियमांचे पालन करून सोसायटीमध्ये ये-जा करण्याचे अधिकार आणि Gate Pass देण्यात येईल.

ह्याच पोर्टलवर सोसायटीचे रजिस्ट्रेशन, मिटींग्सचे मिनिट्स, ऑडिट रिपोर्ट्स वगैरे फक्त सभासदांना पाहावयास उपलब्ध करून देण्यात येतील.

त्याचप्रमाणे ह्याच वेब पोर्टलवरून मीटिंगच्या नोटीसा आणि इतर सूचना वगैरे वेळोवेळी करण्यात येतील. एखाद्या महत्वाच्या वा अवघड प्रश्नावर काही निर्णय घ्यावयाचा असल्यास इन्स्टंट poll चा देखील वापर करण्यात येईल.

सर्वांनी सोसायटीला देणे असलेली रक्कम ह्याच Payment Gate चा वापर करून भरावयाची आहे. त्यांना त्वरित Payment Receipt मिळेल.

ह्या वेब पोर्टलमध्ये सोसायटीच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या खालील सुविधांचा समावेश असेल कि जेणेकरून रिमोट-प्लेस वरूनही सोसायटीशी संबंध साधता येऊ शकेल. आपल्या काही तक्रारी अथवा सूचना असल्यास आपण Complaint /Suggestion Box मध्ये नोंदवून तिकीट राईज् करू शकता. आपला प्रश्न लवकरात लवकर ऍड्रेस करण्याचा प्रयत्न सोसायटी व्यवस्थापन करेल.

आपण सर्वांनी वेळच्यावेळी Maintenance ची Due रक्कम दिल्यास आपल्याला कार्यक्षम सेवा देता येणे शक्य होईल.

View in English

स्नेहांगण

शिंदेवाडी, शिरवळ, सातारा

मदतीसाठी संपर्क

+917385308700

snehagan.shirawal@gmail.com